रांची (वृत्तसंस्था) एका १५ वर्षीय तरुणीवर १० ते १२ मुलांनी ३ महिन्यात ३० वेळा बलात्कार केल्याची धक्कादायक घटना झारखंडच्या खूंटी जिल्ह्यात घडली आहे.
पीडितेने चाईल्ड वेल्फेअर कमिटीला सांगितलेली हकीगत अशी की, ती एकेदिवशी खूंटी बाजारात गेली होती. तेव्हा बजरंग नावाच्या मुलासोबत तिची ओळख झाली. दोघांमध्ये मैत्री झाल्यानंतर बजरंगने आपला मित्र सूरज सोबत बाईकवरुन पीडीतेला सिंबुकेल गावात घेऊन आले. त्यानंतर दोघांनी तिला हडिया पाजले आणि माझा मोबाईल घेतला. त्यानंतर मला परत बाजारात आणून सोडले. पीडिने जेव्हा बजरंगला फोन करुन तिचा मोबाईल मागितला. तेव्हा बजरंग तिला एका सुनसान जागेवर बोलवून तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर प्रत्येकवेळी त्याच्यासोबत वेगवेगळी मुलं असायची. विरोध केल्यावर तो जीवे मारण्याची धमकी देत होता. हा प्रकार तीन महिने सुरु होता, असा आरोपही पिडीतेने केला आहे. सामाजिक कार्यकर्त्या खुशबू खातून यांनी हा प्रकरा उघडकीस आणला. याप्रकरणात मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी खूंटी जिल्हा प्रशासनाला पीडितेची काऊन्सलिंग करण्याचे आदेश दिले आहेत.