ज्वेलर्स दुकान फोडून २ लाख २१ हजारांचा ऐवज लांबविला

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील सप्तश्रृगी कॉलनीतील ज्वेलर्स दुकान फोडून सोन्याचे दागिने व रोकड असा  २ लाख २१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना उघडकीला आली आहे.  यासंदर्भात शनिवारी १३ मे रोजी सायंकाळी ७ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, अमळनेर शहरातील मुंदडा पार्क, सप्तशृंगी कॉलनीत मनीष प्रकाश सोनार (वय-३५) यांचे मानसी ज्वेलर्स अँड कॉस्मेटिक नावाचे दुकान आहे. १३ मे रोजी मध्यरात्री साडेतीन  वाजेच्या सुमारास अज्ञात चोरटे चारचाकी वाहन क्रमांक (एमएच ०९ एक्यू १५५९) ने दुकानाजवळ आले. दुकानाचे शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश करत सोन्याचे व चांदीचे दागिने व ५० हजारांची रोकड असा एकूण २ लाख २१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल तसेच सीसीटीव्ही कॅमेरा देखील चोरून नेला. ही घटना घडल्यानंतर  मनीष सोनार यांनी अमळनेर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर अमळनेर पोलीस ठाण्यात शनिवारी १३ मे रोजी सायंकाळी ७ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेशसिंह परदेशी करीत आहे.

Protected Content