नवी दिल्ली (वृत्तसंस्था) मध्य प्रदेशमधील काँग्रेसचे नेते आणि माजी खासदार ज्योतिरादित्य शिंदे यांनी नुकताच भाजपामध्ये प्रवेश केला.
यावेळी नड्डा यांच्यासह केंद्रीय मंत्री धमेंद्र प्रधान,भाजप नेते विनय सहस्त्रबुद्धे, जय पांडा, भाजप प्रवक्ते जफर इस्लाम उपस्थित होते. दिल्लीत पक्षाच्या मुख्यालयात त्यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम झाला. काँग्रेसचे मोठे नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला. याचबरोबर 22 आमदारांनीही विधानसभाध्यक्षांकडे राजीनामा पाठवून दिल्याने काँग्रेस अल्पमतात आली आहे. मध्य प्रदेशात ज्योतिरादित्य शिंदे नाराज होते. कमलनाथ यांना मुख्यमंत्रीपद दिलं गेल्याने ही नाराजी उघडपणे समोर आली होती. दरम्यान, मोदी-शाह यांच्या भेटीनंतर ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसची साथ सोडली.