मुंबई प्रतिनिधी । ज्येष्ठ रंगकर्मी राजा मयेकर (वय९०) यांचे आज निधन झाले असून रात्री त्यांच्या पार्थिवावर अत्यंसंस्कार करण्यात येणार आहेत.
राजा मयेकर यांनी नाटक, सिनेमा, टीव्ही मालिका आणि आकाशवाणी या चारही क्षेत्रांत चमकदार कामगिरी केली होती. लोकनाट्याचा राजा म्हणून मयेकर यांची ओळख होती. त्यांनी सुमारे सहा दशके रसिकांचे मनोरंजन केले. दशावतारी नाटकापासून राजा मयेकर यांनी अभिनयाचा प्रवास सुरू केला. त्यांची गुंतता ह्रदय यामधील मास्तरची भूमिका त्याकाळी खूप गाजली. कामाची सुरुवात त्यांनी कामगार रंगभूमीपासून केली. शाहीर साबळेंसारख्या अनेक दिग्गजांच्या सोबत त्यांनी काम केले. त्यांच्या निधनाने मराठी नाट्यसृष्टीतील एक मातब्बर व्यक्तीमत्व काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना व्यक्त होत आहे.