जळगाव प्रतिनिधी । भारतीय जनता पक्षाचे नेते व माजी मंत्री गिरीश महाजन यांना नेतृत्वात आज शेतकर्यांच्या विविध मागण्यासाठी जळगावात जिल्हाधिकारी कार्यालयावर किसान मोर्चा काढण्यात आला. यानंतर आकाशवाणी चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी जोरदार शक्ती प्रदर्शन करत पक्षाच्या नेत्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले.
जळगाव जिल्हा भाजपतर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालयावर किसान मोर्चा काढण्यात आला. पिक विमा योजनेचे निकष त्वरीत बदलावेत, शेतकर्यांना नुकसान भरपाई त्वरीत द्यावी, कापूस खरेदी केंद्रे त्वरीत सुरू करावी; यासारख्या मागण्या करण्यात आल्या. याकरीता भाजपने जिल्हाधिकारी कार्यालयवर किसान मोर्चा काढला. या मोर्चात माजी मंत्री आ. गिरीश महाजन, भाजप जिल्हाध्यक्ष तथा आमदार राजूमामा भोळे, खासदार रक्षा खडसे, खासदार उन्मेष पाटील, महापौर भारती सोनवणे, महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, आमदार संजय सावकारे आदींसह अन्य नेते व पदाधिकारी उपस्थित होते. प्रारंभी उपस्थित नेत्यांनी आपल्या भाषणातून राज्य सरकारवर जोरदार टिकास्त्र सोडले. यानंतर शेतकर्यांच्या विविध मागण्याचे निवेदन जिल्हाधिकार्यांना देण्यात आले.
दरम्यान, यानंतर आकाशवाणी चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. शेतकर्यांना नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे, केळी पिक विम्याचे निकष त्वरीत बदला, शेतकर्यांच्या पिकाला भाव मिळालाच पाहिजे, जो सरकार निक्कमी है, वो सरकार बदलनी है! अशा राज्य सरकारविरोधात घोषणा दिल्या. यावेळी आमदार गिरीश महाजन हे आपल्या सहकार्यांसह बैलगाडीवरून आकाशवाणी चौकात आले. येथे त्यांनी राज्य सरकारवर तोफ डागली. राज्य सरकारने पिक विम्याचे निकष बदलून शेतकर्यांवर अन्याय केला आहे. अतिवृष्टीमुळे शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांना अद्यापही भरपाई मिळालेली नाही. राज्यातील हे सरकार शेतकर्यावर अन्याय करत असल्याचा आरोप त्यांनी केला. खासदार रक्षा खडसे यांनी राज्यातील मंत्र्यानी केंद्रांतील शासनाने जो आदेश काढला आहे. त्याबाबत अभ्यास करण्याची गरज आहे. केंद्राने केळी पिक विम्याबाबत काय अध्यादेश काढला आहे. त्याचा अभ्यास करण्याचे अवाहन केले. खासदार उन्मेष पाटील व आमदार राजूमामा भोळे यांनी देखील सरकारवर टीका केली.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/282051296458150/
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/282051296458150/
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/2826959950894163/