रावेर, प्रतिनिधी । रात्री झालेल्या जोरदार पावसाने रावेर तालुक्यातील मंगळुर,आभोडा आणि सुकी धरण शंभर टक्के भरले असून भोकर नदीला पाणी आले आहे. यामुळे पुनखेडा-रावेर रस्ता बंद झाला आहे.बऱ्याच दिवसाच्या विश्रांतीनंतर तालुक्यात पावसाने कमबॅक केले आहे.
रावेर तालुक्यात काल रात्री जोरदार पावसाने झोडपले. या जोरदार पावसाने रावेर तालुक्यातील मंगळुर, आभोडा, आणि सुकी धरण शंभर टक्के भरले असून भोकर नदीला पाणी आले आहे. यामुळे पुनखेडा-रावेर रस्ता बंद पडला आहे. बऱ्याच दिवसांपासुन रावेर तालुक्यात पावसाची प्रतीक्षा होती.