जळगाव -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या रसायन तंत्रज्ञान संस्थेचे संचालक प्रा. जितेंद्र नाईक आणि त्यांचे संशोधक विद्यार्थी डॉ. उमाकांत वर्मा यांना ‘बायोअॅव्हेलिबिलीटी एन्हान्समेंट अॅण्ड डेव्हलपमेंट ऑफ टेस्ट मास्कड् ड्राय पावडर फॉर ओरल सस्पेन्शल ऑफ अॅन्टीव्हायरल एजन्ट’(जैवउपलब्धता वाढविण्यासाठी पाण्यातून दिली जाणारी कोरडी पावडर) या संशोधनाकरिता भारत सरकारचे पेटेंट मिळाले आहे.
लहान मुलांच्या औषधांसाठी हे संशोधन अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. लहान मुलांच्या औषधांचे क्षेत्र पुर्वी पासूनच दुर्लक्षित राहिलेले आहे. योग्य प्रमाणाच्या कमतरतेचा अभाव असल्यामुळे लहान मुलांना वारंवार लिहून दिलेली औषधी दिली जातात. ज्याचा त्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो. मौखिक औषधाची चव ही उपचारात्मक पथ्ये आणि उपचारात्मक परिणामांचे पालन करण्यावर परिणाम करणारे महत्वाचे घटक आहे. लोकांना चव चांगली असणारी आणि सहज देता येवू शकतील अशी प्रभावी औषधी हवी आहेत.
प्रा. नाईक यांनी केलेल्या या औषधाच्या संशोधनात प्रभावीपणा असून अॅण्टीव्हायरल जैव उपलब्धता वाढणार असून ही कोरडी पावडर लहान मुलांना पाण्यात टाकून प्यायला देणे सहज शक्य आहे. ज्यामुळे लहान मुलांना कडवट लागणार नाही मात्र त्याचा तात्काळ प्रभाव बालरूग्णांवर राहील.
प्रा. नाईक व डॉ. वर्मा यांना भारत सरकार कडून प्राप्त झालेल्या या पेटेंट बद्दल कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी, प्र-कुलगुरू प्रा.एस.टी. इंगळे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.