चाळीसगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | तालुक्यातील बोढरे-शिवापूर शिवारातील जे.बी.एम.सोलार कंपनीच्या नवीन एजन्सीत युवकांना वा कामगारांना कायम सेवेत घेण्याबाबची मागणी भारतीय जनता पक्षाने तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सविस्तर वृत्त असे की, चाळीसगाव तालुक्यातील बोढरे-शिवापूर शिवारात जे.बी.एम.सोलार (१०० मेगावॅट) कंपनी आहे. यात काम करणारे युवक हे तालुक्यातील विविध ठिकाणचे असून सन:२०१८-१९ पासून ते आजपावेतो जे.बी.एम.सोलार (१०० मेगावॅट) ग्रृपच्या वतीने एस. आय. एस सेक्युरीटी प्रायव्हेट लिमिटेड मध्ये इमानदारीने व कर्तव्यतत्पर राहून सेवा देत आहेत. परंतु येत्या १५ फेब्रुवारी २०२२ पासून सदर एस. आय. एस सेक्युरीटी प्रायव्हेट लिमिटेड कडून दुसऱ्या एजन्सीकडे काम देण्यात येणार आहे. त्यामुळे नवीन एजन्सीकडे काम वर्ग करताना कोणत्याही कामगारांना कामावरून काढण्यात येऊ नयेत अशी मागणी भारतीय जनता पक्षाने तहसीलदार अमोल मोरे यांच्याकडे निवेदनाद्वारे मंगळवारी केली आहे. तर कोणत्याही कामगाराला कामावरून काढल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे. तत्पूर्वी जोरदार घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला.
निवेदनावर भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष के.बी. साळुंखे, तालुकाध्यक्ष सुनील निकम, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी संचालक राजेंद्र वाडीलाल राठोड, डॉ. रविंद्र तुळशीराम, जिल्हा सरचिटणीस युवा मोर्चा स्वप्निल मोरे, राजेंद्र पगार, धनंजय सुर्यवंशी, राजेंद्र गवळी, योगेश खंडेवाले, रिजवाना खान, प्रशांत शिवरे, उत्तम गरील, सुनिल पवार तालुकाध्यक्ष भाजपा युवा मोर्चा, अर्जून गोपाळ, सुभाष बजाज, अनंत माळी, गोरख चव्हाण, अमोल घाडगे, चंद्रकांत देशमुख, गणेश भोवले, विजय राठोड, प्रशांत बच्चाव, किरण राठोड, शिवराज पाटील, संतोष चव्हाण, विकास चव्हाण, पराग कुलकर्णी आदींनी सह्या केल्या आहेत.