नवी दिल्ली (वृत्तसंस्था) चीनने भारतीय हद्दीत ‘अतिक्रमण’ केल्याचा उल्लेख असलेला रिपोर्ट संरक्षण मंत्रालयाच्या वेबसाईटवरून हटविल्याच्या मुद्द्यावरून कॉंग्रेस नेते राहुल गांधी आक्रमक झाले आहेत. त्यांनी जेव्हा जेव्हा देश भावूक झाला, फाईली गायब झाल्याचे ट्वीट करत मोदी सरकारवर टीका केली आहे.
राहुल गांधी यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलेय की, जेव्हा जेव्हा देश भावूक झाला, फाईली गायब झाल्या आहेत. माल्या असो की राफेल, मोदी असो की चोकसी…हरविल्याच्या यादीत लेटेस्ट आहे, चीनी अतिक्रमणवाले दस्तऐवज. हा योगायोग नाही, मोदी सरकारचा लोकशाही विरुद्धचा प्रयोग आहे, असे म्हटले आहे. राहुल गांधी यांनी तत्पूर्वी केंद्र सरकार आधी मुकं तर होतेच, कदाचित आता दृष्टिहीन आणि बहिरेही झाले आहे, अशा शब्दात मोदी सरकारवर आशा सेविकांच्या संपावरून टीकास्त्र सोडले होते. दुसरीकडे कॉंग्रेसचे नेते पी.चिदंबरम यांनी देखील यावरून संरक्षण मंत्र्यांवर टीका केली होती.