जळगाव, प्रतिनिधी । प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिन घेण्यात येतो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकशाही दिन रद्द करण्यात आल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.
प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. तथापि, सद्यस्थितीत संपूर्ण जगात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झालेला आहे. सदरहू विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने प्रतिबंधात्मक उपाय योजनेतंर्गत संपूर्ण देशभरात 31 जुलै, 2020 पर्यंत लॉकडाऊन घोषित केलेला आहे. त्यानुसार प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून माहे जुलै, 2020 मधील पहिल्या सोमवारी होणारा 6 जुलै, 2020 चा नियोजित जिल्हा लोकशाही दिन रद्द करण्यात आला आहे. अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.