भडगाव लाईव्ह ट्रेन्स न्यूज प्रतिनिधी !जुन्या भांडणाचे कारणावरून तरुणाला लाकडी दांडका व धारदार हत्यारांनी वार करून गंभीर जखमी केल्याची घटना समोर आली असून यासंदर्भात भडगाव पोलीस ठाण्यात ३ जणांना विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चेतन निवृत्ती पवार (वय-३०) रा. कजगाव ता. भडगाव असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.
शुक्रवार ३० जून रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास मागील भांडणाच्या कारणावरून गावात राहणारा दीपक लालसिंग पाटील, जय दीपक पाटील आणि पियुष दीपक पाटील या तिघांनी चेतन पवार याला लाकडी दांडक्याने मारहाण केली तसेच एकाने धारदार वस्तूने पोटावर वार करून गंभीर दुखापत करत जीवे ठार मारण्याची धमकी दिली आहे. या संदर्भात चेतन पवार याची चुलत भाऊ समाधान पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी दीपक लालसिंग पाटील, जय दीपक पाटील, पियुष दीपक पाटील या तिघां विरोधात भडगाव पोलीस ठाण्यात शनिवारी १ जुलै रोजी सायंकाळी सात वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेबाबत पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रसेन पालकर करीत आहे.