जुन्या भांडणाच्या कारणावरून दाम्पत्याला बेदम मारहाण

जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर शहरातील माळी गल्ली परिसरात मागील भांडणाच्या कारणावरून विवाहितेसह तिच्या नातेवाईकांना लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना घडली आहे. याबाबत जामनेर पोलीस ठाण्यात ९ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जामनेर पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, माया राहुल माळी (वय-२३) रा. माळी गल्लीजामनेर या महिला आपल्या पतीसह वास्तव्याला आहे. बुधवार ८ फेब्रुवारी रोजी रात्री ८.३० वाजता मागील भांडणाच्या कारणावरून तुषार शिवाजी झाल्टे, अश्विनी शिवाजी झाल्टे, रेखाबाई शिवाजी झाल्टे, आशाबाई ईश्वर रोकडे, राजनंदिनी गणेश झाल्टे, गणेश राजाराम झाल्टे, सचिन राजाराम झाल्टे, नितीन राजाराम माळी आणि अक्षय रामदास माळी सर्व रा. धनपुष्प कॉलनी, जामनेर यांनी लाथाकाठ्यांनी बेदम मारहाण केली. तसेच माया राहुल माळी यांचे पती राहुल माळी यांना देखील पाठीवर व उजव्या हातावर बेदम मारहाण करून जंभीर गंभीर दुखापत केली. हा प्रकार घडल्यानंतर विवाहितेने रविवारी १२ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता जामनेर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून जामनेर पोलीस ठाण्यात ९ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल जयेंद्र पगारे करीत आहे.

Protected Content