जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी राज्यातील सरकारी, निमसरकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी महासंघाच्या वतीने १४ मार्चपासून राज्यव्यापी संपावर जाणार आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भावनासमोर शिक्षक व महसूल कर्मचाऱ्यांनी शुक्रवार १० मार्च रोजी एक दिवसीय धरणे आंदोलन करून जिल्हाधिकारी अमन मित्तल यांना निवेदन देण्यात आले.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना व राज्य सरकारी निमसरकार सरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी जिल्हा परिषद महासंघ समितीच्या वतीने राष्ट्रीय पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना प्रभावीपणे लागू करावी, या मागणीसाठी राज्यातील सर्व १७ लाख सर्व सरकारी निमसरकारी कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी १४ मार्च रोजीपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी अमन मित्तल यांना संपावर जाण्यावर संदर्भात निवेदन देण्यात आले आहे. देशातील पश्चिम बंगाल, राजस्थान, छत्तीसगड, झारखंड, केरळ, पंजाब या राज्यातील आपल्या सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू केलेले आहे. अनुषंगाने महाराष्ट्रात देखील सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करावी या मागणीसाठी १४ मार्च रोजी राज्यव्यापी काम बंद आंदोलन करण्याचा पवित्र घेतला आहे. जोपर्यंत जुने पेन्शन योजना लागू होत नाही तोपर्यंत संप मागे घेणार नाही असा निर्धार देखील संघटनेच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे. याप्रसंगी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मगन पाटील, सरचिटणीस अमर परदेशी, प्रमुख संघटन देवेंद्र चंदनकर, सर्जेराव बेडीसकर, बी.एम. बाविस्कर दिलीप बारी, शरेंद्र परदेशी, विजय जगताप, योगेश नन्नवरे, गोविंदा पाटील, घनश्याम चौधरी यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते संघटनेचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.