नवी दिल्ली, वृत्तसेवा । संसदेत घुसणाऱ्या एका व्यक्तीला दिल्ली पोलिसांनी अटक केली. त्याचं नाव अख्तर खान असं आहे. तो संसदेत ८ नंबरच्या गेटमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत होता. यावेळी सुरक्षा रक्षकांनी त्याची तपासणी केल्यावर त्याच्याकडे ३ जिवंत काडतुसं आढळून आली.
अख्तर खान संसदेत घुसत असताना सुरक्षा सरक्षकांनी त्याला आडवलं. त्याची तपासणी केली. यावेळी त्याच्याकडे जिवंत काडतुसं आढळून आली. यानंतर त्याला संसदेत प्रवेश नाकारण्यात आला. आपण ही काडतुसं काढून ठेवण्यास विसरलो, असं त्याने सुरक्षा रक्षकांना सांगितलं. यानंतर सुरक्षा रक्षकांनी त्याला दिल्ली पोलिसांच्या हवाली केलं. दिल्ली पोलिसांकडून आता त्याची चौकशी करण्यात येतेय. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या इसमाचं नाव अख्तर खान (वय ४४) आहे. त्याच्या वडिलांचं नाव शब्बीर खान आहे. तो गाझियाबादचा राहणारा आहे.