जळगाव प्रतिनिधी । आज जिल्ह्यात ५० नवीन कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळले असून यात पाचोर्यासह रावेर व यावल तालुक्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होत असल्याचे दिसून आले आहे.
जिल्हा माहिती कार्यालयाने आज सायंकाळी एका प्रेस नोटच्या माध्यमातून कोरोना बाधीतांबाबत स्टेटस अपडेट केले आहे. यानुसार आज जिल्ह्यात ५० नवीन रूग्ण आढळले असून यामुळे आता जिल्ह्यातील कोरोना रूग्णांची संख्या ९५७ इतकी झाली आहे. आज जिल्ह्यातील सर्वाधीक १७ रूग्ण रावेर तालुक्यातील असून यासोबत यावल तालुक्यातील सहा रूग्णांचा समावेश आहे. उर्वरित तालुक्यांचा विचार केला असता आज जळगावात एक, जळगाव ग्रामीण एक, भुसावळात चार, चोपड्यात तीन, पाचोरा सात, एरंडोल, भडगाव व धरणगाव प्रत्येकी एक, जामनेर तीन, चाळीसगाव चार व मुक्ताईनगर एक अशा रूग्णांचा समावेश आहे.