जिल्ह्यात ‘उज्ज्वल भारत- उज्ज्वल भविष्य’ महोत्सवाचे आयोजन

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |   जिल्ह्यात दोन ठिकाणी आजादी का अमृत महोत्सवांतर्गत ‘उज्ज्वल भारत-उज्ज्वल भविष्य -पॉवर @२०४७’ या कार्यक्रमाचे आयोजन कार्यात आले असून या कार्यक्रमांना नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा प्रशासन व महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे.

 

आजादी का अमृत महोत्सवांतर्गत ‘उज्ज्वल भारत-उज्ज्वल भविष्य -पॉवर @२०४७’ हा कार्यक्रम भारत सरकारच्या ऊर्जा मंत्रालय व नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय तसेच महाराष्ट्रातील महावितरण, महानिर्मिती, महापारेषण आणि इतर भागीदार यांच्या संयुक्त विद्यमाने राज्य शासनाच्या सहकार्याने साजरा करण्यात येणार आहे. जळगाव जिल्ह्यात दोन ठिकाणी हा कार्यक्रम होणार आहे.   मंगळावर दि. २६ जुलै रोजी  सकाळी ११ वाजता मयुरेश मॅरेज लॉन, कोठली रोड, भडगाव येथे तसेच शनिवार  दि. ३० जुलै  सकाळी ११ वाजता साई मंदिर हॉल, हरताळे (ता.मुक्ताईनगर) येथे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पारंपरिक व अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रासह केंद्र व राज्य सरकारच्या ऊर्जा क्षेत्रातील मागील ८ वर्षांतील उत्कृष्ट कामगिरीची माहिती देण्यासाठी तथा विविध योजनांतील लाभार्थ्यांचा सत्कार व त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी तसेच ऊर्जा क्षेत्रातील आव्हाने व २०४७ पर्यंतचे नियोजन याकरिता या अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमात केंद्र सरकार व राज्य सरकारच्या विविध ‍विद्युत योजनाच्या माध्यमातून गावपाड्यात, शेतात ऊर्जीकरण झालेल्या कामांची माहिती देणारे प्रदर्शन, ध्वनिचित्रफितीचे सादरीकरण, लाभार्थ्यांचे मनोगत, पथनाट्य तथा सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा प्रशासन व महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे.

 

Protected Content