जळगाव प्रतिनिधी । जिल्हा कोवीड रूग्णालयाने पाठविलेल्या संशयितांचे स्वॅबचा तपासणी अहवाल आज सायंकाळी प्राप्त झाला असून आलेल्या रिपोर्टमध्ये जिल्ह्यात आज एकुण १७० रूग्ण कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले. जिल्ह्यात सर्वाधित जळगाव आणि पारोळा तालुक्यात आढळून आले आहे.
जिल्हा माहिती कार्यालयाने आज संध्याकाळी एका प्रेस नोटच्या माध्यमातून जिल्ह्यातील कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांची माहिती दिली आहे. यानुसार आज जिल्ह्यात सर्वाधीक ४२ रूग्ण हे जळगाव शहरातील असून आढळून आले असून याच्या खालोखाल २२ रूग्ण हे पारोळ्याचे आहेत. उर्वरित तालुक्यांचा विचार केला असता, रावेर १९, जळगाव ग्रामीण, जामनेर व पाचोरा प्रत्येकी १०; भुसावळ ११, अमळनेर ७, चोपडा ६, भडगाव २, धरणगाव ५, यावल ८, एरंडोल २, चाळीसगाव ५, मुक्ताईनगर ८, बोदवड २, अन्य जिल्हा २ असे रूग्ण आहे.
आजच्या १७० रूग्णांमुळे जिल्ह्यातील आजवरच्या कोरोना बाधीतांची संख्या तब्बल २७५७ इतकी झाली आहे. यातील तालुक्यानुसार कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. जळगाव शहर – ५४५; भुसावळ -३७९; अमळनेर – २७५; रावेर – २०६; जळगाव ग्रामीण- ८९; भडगाव – ११५; चोपडा- २०४; पाचोरा- ६५; धरणगाव – १२०; जामनेर – १३६; यावल – १२९; एरंडोल – ९४; पारोळा- २०६; चाळीसगाव – ३१; बोदवड- ३८; मुक्ताईनगर – २५; बाहेरील जिल्ह्यातील- १०, जिल्हृयांबाहरील ९० असे एकुण २७५७ रूग्ण जिल्ह्या कोरेाना बाधित आहे.
जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांपैकी दिवसभरात ११३ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. तर आजपर्यंत १५७६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना बाधित रूग्ण वाढत असले तरी बरे होण्याचे प्रमाण ६१ टक्क्यांपर्यंत वाढले आहे,