जळगाव प्रतिनिधी । आज सायंकाळी प्रशासनातर्फे जारी करण्यात आलेल्या माहितीत जिल्ह्यातील १३ रिपोर्ट पॉझेटीव्ह आढळून आले असून भुसावळसह जळगाव व अमळनेरच्या रूग्णांचा समावेश आहे.
जिल्हा माहिती कार्यालयाने आज एका सायंकाळी प्रेस नोटच्या माध्यमातून कोरोना बाधितांबाबतची माहिती अपडेट केलेली आहे. यानुसार- जिल्ह्यातील भुसावळ, धरणगाव, जळगाव, एरंडोल, भडगाव, अमळनेर येथील स्वॅब घेतलेल्या संशयित कोरोना व्यक्तीपैकी 30 व्यक्तींचे तपासणी अहवाल नुकतेच प्राप्त झाले असून त्यापैकी 17 व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर तेरा व्यक्तीचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तीमध्ये भुसावळ शहरातील 5, अमळनेर येथील 2, जळगाव येथील 3, तर तळवेल, ता. भुसावळ, एरंडोल व भडगाव येथील प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या 441 इतकी झाली आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.