जिल्ह्यात आज १३८ रूण कोरोना पॉझिटीव्‍ह आढळले; जळगावसह बोदवडात संसर्ग वाढला

जळगाव प्रतिनिधी । आज सायंकाळी आलेल्या अहवालात जिल्ह्यात १३८ रूग्ण कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहे. यात जळगावसह, बोदवड, भुसावळ आणि यावल तालुक्यात पुन्हा एकदा कोरोनाने कहर केला आहे.

जिल्हा माहिती कार्यालयाने आज सायंकाळी एका प्रेस नोटच्या माध्यमातून जिल्ह्यातील कोरोना बाधीतांची माहिती जाहीर केली आहे. यानुसार जिल्ह्यात आज १३८ रूग्ण आढळून आले आहेत. यात सर्वाधीक रूग्ण संख्या ३९ ही जळगाव शहरातील असून त्यांच्या खालोखाल बोदवड १९, भुसावळ आणि यावल प्रत्येकी १३ तर चोपडा ११ व रावेर तालुक्यात १० रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहे.

उर्वरित तालुक्यातील आजची आकडेवारी याप्रमाणे आहे. जळगाव ग्रामीण ६, अमळनेर ७, पाचोरा १, भडगाव ५, धरणगाव १, एरंडोल ३, जामनेर ३, पारोळा ५, चाळीसगाव १, मुक्ताईनगर १ असे रूग्ण आढळून आलेत.

आत्तापर्यंत तालुकानिहाय आढळून आलेले रूग्ण
जळगाव शहर ७८२, जळगाव ग्रामीण १२५, भुसावळ ४३२, अमळनेर ३२६, चोपडा २५४, पाचोरा ९२, भडगाव २३३, धरणगाव १५९, यावल १९७, एरंडोल १५८, जामनेर २०२, रावेर २६८, पारोळा २२८, चाळीसगाव ४५, मुक्ताईनगर ४०, बोदवड ७९, दुसऱ्या जिल्ह्यातून आलेले रूग्ण १०, जळगाव जिल्ह्यातील इतर जिल्ह्यामधील रूग्ण ९० असे एकुण ३ हजार ७२० रूग्ण आढळले आहे..

एकुण आलेख
आढळून आलेल्या रूग्णांपैकी आज सायंकाळपर्यंत एकुण २ हजार १९९ रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत. तर एकुण २५० जणांना मृत्यू तर १ हजार २७१ रूग्ण उपचार घेत आहे.

Protected Content