जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्या एकुण ३१ वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे अशी माहिती उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकान्वये बुधवारी २८ जून रोजी सायंकाळी ५ वाजता दिलेल्या प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.
लेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली २० जून ते २८ जून या कालावधीत जळगाव जिल्ह्यातील अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्या एकूण ३१ वाहनांवर कारवाई करण्यात आलेली आहे. ही कारवाई अप्पर जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांनी केली आहे. कारवाई केलेले संबंधित वाहन हे तालुक्याच्या ठिकाणी जप्त करण्यात आलेले आहेत. यामध्ये एकूण वाळू वाहतूक करणारे १७ डम्पर, १७ ट्रॅक्टर्स, तीन टेम्पो आणि १ ओमनी व्हॅन अश्या वाहनांचा समावेश आहे. या संदर्भात जळगाव तालुक्यात गौण खनीज वाहतूक करणाऱ्या ३ वाहनांविरोधात संबंधित पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे यांनी बुधवारी २८ जून रोजी सायंकाळी ५ वाजता दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.