जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसह इतर प्रमुख मागण्यांसाठी भाजपचा आक्रोश मोर्चा (व्हिडिओ)

जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसह विज पुरवठा सुरळीत करावा या प्रमुख मागण्यांसाठी आणि महाविकास आघाडीविरोधात भाजपातर्फे माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मंगळवार १२ एप्रिल रोजी भव्य जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला.

 

याबाबत माहिती अशी की, गेल्या महिन्याभरापासून शेतकऱ्यांना किमान ८ तास अखंडीत विजपुरवठा मिळत नाही. यामुळे शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. यासंदर्भात शेतकऱ्यांनी महावितरण प्रशासनाला वारंवार पाठपुरावा करून आणि वेळोवेळी निवेदन देवून याकडे साफ दुर्लक्ष केले जात आहे. दरम्यान तीन दिवसांपुर्वी खासदार उन्मेश पाटील यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना भेटून तीन दिवसात वीजपुरवठा सुरळीत करावा या संदर्भात निवेदन देण्यात आले होते. शेतकऱ्यांच्या मागण्यांची पुर्तता झाली नाही व मागण्यांकडे प्रशासन आणि महाविकास आघाडी दुर्लक्ष केले. शेतकऱ्यांना विजपुरवठा सुरळीत करावा आणि इतर मागण्यांसाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने मंगळवारी १२ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आला. यावेळी महाविकास आघाडीविरोधात घोषाणाबाजी करण्यात आली.

यावेळी माजी मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. रब्बी पिकांला आता विजेची अत्यंत गरज असतांना मोठ्या प्रमाणावर लोड शेडींगच्या नावाखाली विजपुरवठा दिला जात नाही. विज नसल्याने शेतकऱ्यांची पिकांचे मोठे नुकसान होत आहे. दरम्यान येत्या तीन दिवसात शेतकऱ्यांना विजपुरवठा सुरळीत झाला नाही तर रास्ता रोको आणि चक्का जाम आंदोलन करण्यात येईल असे सांगितले.

या आंदोलनात खासदार उन्मेश पाटील, आमदार राजूमामा भोळे, महानगराध्यक्ष दीपक सुर्यवंशी, आमदार मंगेश चव्हाण, खासदार रक्षा खडसे, माजी आमदार स्मिता वाघ, भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष उज्ज्वला बेंडाळे, रिपाइंचे महानगराध्यक्ष अनिल अडकमोल, जामनेरच्या नगराध्यक्ष साधना महाजन, जि.प.अध्यक्षा रंजना पाटील, माजी महापौर सिमा भोळे, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष गोविंद अग्रवाल, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष दिप्ती चिरमाडे यांच्यासह जिल्ह्यातील भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भाग १
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/390005789642787

भाग २
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/4954712257969046

भाग ३

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/731980194469552

भाग ४

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/2111668252327328

 

Protected Content