जळगाव, प्रतिनिधी । जिल्ह्यात अधिकृतरीत्या परवानगी न घेता बोअरवेल तयार करण्याच्या कामात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून जिल्ह्यात पाणी टंचाईच्या झळा जाणवू लागल्याने अशा बेकायदेशीर होणारे बोरवेलीची कामे थांबविण्यात यावीत अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेद्नावारे करण्यात आली आहे.
निवेदना आशय असा की, जिल्ह्यात पाणी टंचाईच्या झळा तीव्रपणे जाणवू लागल्या आहेत. जिल्ह्यातील महानगर पालिका व नगरपालिका भागात शहरीकरणाचा विस्तार होत असून यात बांधकामांमध्ये वाढ होत आहे. तसेच बोअरवेल बनविण्याच्या प्रमाणत वाढ झालेली आहे. याप्रकाराने जिल्ह्यातील पाणी पातळी दिवसेंदिवस खालवत आहे. बोअरवेल किती फुट खोल करायला हवी याबाबत कोणत्याच प्रकारची नियमावली वापरली जात नाही. बोअरवेल खोदताना नागरिक प्रशासनाची कोणतीही परवानगी घेत नसून प्रशासन देखील याबाबत सूचना करत नसून भूजल विभागाने ठरवून दिलेल्या नियमावलीचे पालन करत नाही. बोअरवेल व्यावसायिकांच्या सांगण्यानुसार बोरवेलची मार्यदा ठरवली जाते. यात संबधित नागरिक व बोअरवेल व्यावसायिक या मर्यादेचे उल्लंघन करताना दिसून येतात. सतत वाढत जाणाऱ्या बोअरवेलमुळे पाण्याची पातळी कमी होत असून पाण्याचा वापराबाबत देखील अतिरेक होताना दिसत आहे. मागील दोन वर्षापासून पाऊस चांगल्या प्रकारे पडल्यामुळे पाण्याची टंचाई अद्याप जाणवत नसली तरी काही भागात पाणी टंचाईचे संकेत आतापासूनच मिळत आहेत. शहरी भागात अधिक प्रमाणात बोअरवेल होत आहेत व याच्या दुप्पट प्रमाणात पाण्याची नासाडी, अतिरेक होतांना दिसून येत आहे. तेथील लोकांना पिण्याचे पाणी व दैनदिन वापरासाठी लागणारे पाणीसुद्धा १० ते १५ दिवसाआड मिळत आहे. उप जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, महानगराध्यक्ष संदिप मांडोळे, उपनगर अध्यक्ष इमाम पिंजारी, हर्षल वाणी, जिल्हा संघटक राजेंद्र निकम, शशिकांत बडगुजर यांनी निवेदनाद्वारे केली आहे.