जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आझादी का अमृत महोत्सवानिमित्त जळगाव जिल्हा होमगार्डच्या वतीने ‘हर घर तिरंगा’च्या जनजागृतीसाठी रेल्वे स्टेशन ते जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयापर्यंत रविवारी ७ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजतापायी रॅली काढण्यात आली.
होमगार्ड विभागाच्या वतीने काढण्यात आलेली पायी रॅली ही जळगाव रेल्वे स्टेशन येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेबा आंबेडकर पुतळापासून सुरूवात करून नेहरू चौक, टॉवर चौक, चित्रा चौक, कोर्ट चौक, शहर वाहतूक शाखा आणि जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालय अशी काढण्यात आली. या रॅलीत सेंटर कमांडर सादिक तडवी, पलटन नायक लक्ष्मण तडवी, समादेशक अधिकारी संजय पाटील, कंपनी कमांडर सुनील पाटील, वरिष्ठ पलटन नायक कडू सपकाळे, फलटन नायक रवींद्र ठाकूर, अनिल पाटील, सचिन वाघ, भिका चव्हाण, हिरामण सोनवणे, शांताराम पाटील, भावेश कोठावदे यांच्यासह होमगार्डचे कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविला होता.