जळगाव प्रतिनिधी । शहरातील वाहतूक शाखेच्या परिसरातून एकाची दुचाकी लांबविल्याची घटना सोमवारी उघडकीला आली आहे. दुचाकीचा शोध न लागल्याने मंगळवारी ८ डिसेंबर रोजी रात्री उशीरात जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, अजय प्रल्हाद बाविस्कर (वय-३९) रा. पार्वती नगर यांची बजाज सीटी हंड्रेड दुचाकी क्रमांक (एमएच १२ एजे २२००) आहे. त्यांनी शहरातील शहर वाहतूक शाखेच्या परिसरात ४ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजता दुचाकी पार्किंगला लावली होती. ७ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता दुचाकी जागेवर आढळून आली नाही. परिसरात शोधाशोध केली असता मिळून आली नाही. अजय बाविस्कर यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरोधात जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक धनंजय निकुंभ करीत आहे.