जिल्हा पेठ पोलीस स्थानकात आरोपींचे हक्क फलकाचे अनावरण (व्हिडिओ)

जळगाव,प्रतिनिधी | जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे आरोपींचे अटक आणि अटकपूर्व अधिकार व हक्क यांच्याबाबत जिल्हा पेठ पोलीस स्थानकात जनजागृती फलकाचे अनावरण करण्यात आले. याप्रसंगी न्यायाधीश जी. एस. ठुबे, जिल्हापेठचे पोलीस निरिक्षक रामदास वाकोडे आदींची उपस्थिती होती.

 

आरोपींना असलेल्या हक्कांची त्यांना माहिती व्हावी यासाठी राष्ट्रीय विधीसेवा प्राधिकरणातर्फे पँन इंडिया अवेरनेस अंतर्गत देशभर आरोपींचे अटक आणि अटकपूर्व अधिकार व हक्क उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती जिल्हा सत्र न्यायाधीश श्री. एस.जी. ठुबे यांनी दिली. तर जिल्हापेठचे पोलीस निरिक्षक रामदास वाकोडे यांनी  सांगितले की, आरोपींचे अटक आणि अटकपूर्व अधिकार व हक्क अंतर्गत जनजागृती करण्यात येत आहे.  या आपल्या अधिकारांची सामन्य नागरिक व आरोपी व त्यांचे नातेवाईक यांना माहिती व्हावी यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे सांगितले. सुप्रीम कोर्टाचा अंतर्गत नालसा यांच्या अंतर्गत २ ऑक्टोबर २०२१ पासून ४५ दिवसाचा कार्यक्रम संपूर्ण भारतात आयोजित करण्यात आलेले आहे. पँन इंडिया अवेरनेस या कार्यक्रमाचा उद्दिष्ट असून प्रत्येक पोलीस स्टेशनला कायदेविषयक फलक लावण्यात येत आहेत. त्या अंतर्गत कायदेविषयक फलकाद्वारे आरोपीला अटक करणे अगोदरचे अधिकार आणि आरोपीला अटक झाल्यानंतरचे अधिकार याचे माहितीफलक भारतातील प्रत्येक पोलीस स्टेशनला आज जिल्हा सत्र न्यायाधीश यांच्या हस्ते प्रत्येक पोलीस स्टेशनला लावण्यात येत आहे. यानुसार आज जिल्हा पेठ पोलीस स्टेशनमध्ये फलकाचे अनावरण करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनचे पो.नि. रामदास वाकोडे,अँड. विजय दर्जी,एपीआय कीशोर पवार,पी.एस आय प्रदिप चांदेकर,विधी सेवा प्राधिकरणाचे ए.पी.कुळकर्णी,गणेश निबांळकर, पीएलव्हि जितेंद्र सोनवणे, लाँ विद्यार्थ्यांनी पल्लवी मिसाळ,हे.काँ. महेंद्र बागुल सह इतर सहकारी कर्मचारी उपस्थित होते.

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/862138751042011

 

Protected Content