जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यातील युवकांनी केलेल्या समाजहिताच्या कार्याचा गौरव व्हावा व त्यांना युवा विकासाचे कार्य करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे. जिल्हास्तर युवा पुरस्कारासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी केले आहे.
अर्ज विहित नमुन्यात भरून केलेल्या कामाचे योग्य ते सबळ पुरावे जसे की, वृत्तपत्र कात्रणे, प्रशस्तीपत्रक, चित्रफिती व फोटो इत्यादी अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. पुरस्कारासाठी प्रस्ताव प्रथम ऑनलाईन सादर करावयाचा आहे. त्यानंतर प्रस्तावाची एक प्रत कार्यालयात जमा करावी. ऑनलाईन अर्ज भरण्याची वेबसाईट jalgaonsports.in, ऑनलाईन अर्ज भरण्याचा दिनांक 1 एप्रिल पर्यंत, अर्जदाराने प्रस्तावाची हार्ड कॉपी कार्यालयात जमा करण्याची अंतिम मुदत 3 एप्रिल, 2020 अशी असून अर्ज जिल्हा क्रीडा अधिकारी, जळगाव श्री. छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल, जळगाव दुरध्वनी क्रमांक 0257-2237080, भ्रमणध्वनी क्रमांक 9421693471 येथे जमा करावा.
अर्जदार युवक/युवतींचे वय पुरस्कार वर्षासाठी 1 एप्रिल रोजी 13 वर्ष पुर्ण व 31 मार्च रोजी 35 वर्षापर्यत असावे, दोन्ही पुरस्कारासाठी अर्ज दिनांक 1 एप्रिल ते 31 मार्च या कालावधीतील केलेली कामगिरी विचारात घेतली जाईल. अर्ज वेबसाईट बरोबरच जिल्हा क्रीडा कार्यालयातही उपलब्ध आहेत. पुरस्कासंबंधी अधिक माहिती क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या http://sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या 12 नोव्हेंबर, 2013 च्या शासन निर्णयामध्ये सुध्दा उपलब्ध आहेत तरी सर्व संबंधितांनी याची नोंद घ्यावी. असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी, जळगाव मिलींद दिक्षित यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वे कळविले आहे.