जिल्हास्तरीय ॲथलेटिक्स खेळाडू व मार्गदर्शक पुरस्कार वितरण

 

जळगाव, प्रतिनिधी। जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन आयोजित जिल्हास्तरीय उत्कृष्ठ ॲथलेटिक्स खेळाडू व उत्कृष्ठ ॲथलेटिक्स मार्गदर्शक पुरस्कार वितरण सोहळा खासदार उन्मेष पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. दिनेश पाटील ,कर्जाने आश्रमशाळेचे मुख्याध्यापक शरद मोरे, राष्ट्रीय खेळाडू बन्सी माळी, प्रा.इकबाल मिर्झा, डॉ.विजय पाटील यांचे प्रमुख उपस्थिती होती. स्व. महेश मधुकर वेरुळकर स्मृती उत्कृष्ठ ॲथलेटिक्स खेळाडू पुरस्कार शालेय गट ललित लक्ष्मण गावंडे जामनेर व महाविद्यालयीन गट आसिफ हमीद तडवी रावेर यांना तर स्व.जितेंद्र शरद ठाकरे स्मृती खुला गट पुरस्कार किशोर विश्वनाथ सुर्यवंशी जळगाव व उत्कृष्ठ क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्रमोद गंगाराम भालेराव चोपडा यांना सन्मानचषक, ट्रॅकसूट व शाल श्रीफळ देऊन गौरविण्यात आले.

याप्रसंगी ॲथलेटिक्स खेळासाठी सर्वोतोपरी मदत करणार असल्याचे आश्वासन खा.उन्मेष पाटील यांनी दिले.

कोरोना काळात ॲथलेटिक्स परिवारातील सदस्य समिधा संदिप सोवनी, देविदास हिरामण महाजन, धीरज किरण जावळे ,किशोर माधवराव पाटील, पुरुषोत्तम चिमणकर, विराज अशोक कावडिया, उमाकांत राजेश जाधव, अमित संजय जगताप, पंकज श्रीकृष्ण वराडे, निलेश श्रीराम पाटील, अॅड. अनिल ननवरे, संदीप हिरामण पवार व विजय विसपुते या सदस्यांनी केलेल्या उत्कृष्ठ कार्याबद्दल यांचा शाल श्रीफळ व कोरोना योद्धा म्हणून सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. तसेच असोसिएशनचे सहसचिव प्रविण पाटील यांना शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल तर जळगाव जिल्हा युवा शारीरिक शिक्षण व क्रीडाशिक्षक महासंघाच्या अध्यक्षपदी डॉ.रणजित पाटील व सचिवपदी प्रा.हरीश शेळके यांची निवड झाल्याबद्दल विशेष सत्कार करून सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन न असोसिएशनचे कार्याध्यक्ष डॉ. पी. आर. चौधरी यांनी, प्रास्ताविक सचिव राजेश जाधव यांनी तर आभार सहसचिव प्रविण पाटील यांनी मानले.

यशस्वीतेसाठी योगेश सोनवणे, प्रा. समीर घोडेस्वार, नितीन पाटील, उल्हास ठाकरे, प्रसन्न जाधव, धिरज पाटील, धिरज महाजन, निखिल पाटील, ज्ञानेश्वर पाटील यांनी कामकाज पहिले.

Protected Content