Home Cities जळगाव जिल्हास्तरीय लोकशाही दिन १ नोव्हेंबरला होणार ऑनलाइन!

जिल्हास्तरीय लोकशाही दिन १ नोव्हेंबरला होणार ऑनलाइन!

0
131

जळगाव,प्रतिनिधी| नागरीकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी दरमहा पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार १ नोव्हेंबरला जिल्हास्तरीय लोकशाही दिन जिल्हाधिकारी कार्यालयात ऑनलाइन पार पडणार आहे.

कोरोनाच्या पाश्वभूमीवर राज्य शासनाने घोषित केलेल्या नियमानुसार टाळेबंधीत तालुका, जिल्हाधिकारी, महानगरपालिका व विभागीयस्तरावर लोकशाही दिन दूरचित्रवाणी परिषदेव्दारे आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत.  त्यानुसार जळगाव जिल्ह्यातील नागरिकांसाठी जिल्हास्तरीय लोकशाही दिन १ नोव्हेंबर, २०२१ रोजी सकाळी ११ .००  वाजता दूरचित्रवाणी परिषदेव्दारे होणार आहे. ज्या नागरिकांच्या काही तक्रारी असतील त्यांनी आपल्या तालुक्यातील तहसील कार्यालयात उपस्थित राहून तक्रारी मांडाव्यात, असे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

 


Protected Content

Play sound