जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । क्रीडा व युवक संचालनालाय पुणे अंतर्गत जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव यांच्यामार्फत नुकताच जिल्हास्तरीय युवा महोत्सव शहरातील छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात पार पडला. अनुभूती स्कूलच्या विद्यार्थ्यांनी ‘काळूबाईचा गोंधळ’ ह्यावर केलेले लक्षणीय सादरीकरण, विषयाची मांडणी आणि सहभागी विद्यार्थ्यांची चुणूक ह्या गोष्टी विचारात घेता अनुभूतीच्या विद्यार्थ्यांना परीक्षकांनी पहिला क्रमांक दिला.
युवकांच्या विविध कलागुणांना वाव देऊन त्यांच्यातील सुप्त गुणांना युवा महोत्सवाच्या माध्यमातून प्रस्तूत करण्याची संधी देण्यात आली होती. जिल्हास्तरीय महोत्सवात लोकगीत प्रकारात अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूलचा प्रथम क्रमांक आला. पुढील विभागस्तरीय स्पर्धेसाठी हा संघ निवडला गेला. जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे उद्घाटन जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दीक्षित तसेच प्रमुख पाहुणे संजय पवार यांच्या हस्ते दीप प्रज्ज्वलन करून तसेच स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे व नटराज मूर्तीचे पूजन करण्यात आले. जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दीक्षित यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. विनोद ढगे यांनी सर्व सहभागी स्पर्धक युवतींना मार्गदर्शन केले.
लोकगीत प्रकारासाठी एकूण चार संघ सहभागी झाले होते. अनुभूती स्कूलच्या विद्यार्थ्यांनी ‘काळूबाईचा गोंधळ’ ह्यावर केलेले लक्षणीय सादरीकरण, विषयाची मांडणी आणि सहभागी विद्यार्थ्यांची चुणूक ह्या गोष्टी विचारात घेता अनुभूतीच्या विद्यार्थ्यांना परीक्षकांनी पहिला क्रमांक दिला. गायक म्हणून पुनम जगताप, देवांशी गुरव, नितीन कोल्हे तेजस चौधरी यांनी तर ढोलकी वादक मोहीत सोनवणे, हार्मोनियमवर ऋषीकेश खोडपे यांनी साथसंगत दिली. या स्पर्धेसाठी संगीत शिक्षक मनोज बोदडे, ज्ञानेश्वर सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. पुढील विभागीय स्पर्धा ३ मार्च २०२३ रोजी नंदुरबार येथे घेतली जाणार आहे. अनुभूती स्कूलचे चेअरमन अतुल जैन, संचालिका निशा जैन, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन तसेच प्राचार्या श्रीमती लाहोटी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.