Home क्रीडा जिल्हास्तरीय क्रीडा बुध्दीबळ स्पर्धेत अदिती अलाहितने पटकावला प्रथम क्रमांक

जिल्हास्तरीय क्रीडा बुध्दीबळ स्पर्धेत अदिती अलाहितने पटकावला प्रथम क्रमांक

0
31

 

पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | जिल्हास्तरीय आंतरशालेय बुद्धिबळ स्पर्धा नुकत्याच जळगाव येथे पार पाडल्या.

गुरुवारी १४ वर्षा खालील विद्यार्थी व विद्यार्थीनींच्या स्पर्धेत १४ तालुक्यातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. हे सर्व विद्यार्थी तालुका स्तरावरून यशस्वी होऊन जिल्हा पातळी वर सहभागी झाले होते.

स्पर्धा ही स्वीसलीग पद्धतीने ७ फेऱ्या घेण्यात आली. यात १४ वर्षाखालील मुलींमध्ये पाचोरा येथील गुरुकुल इंटरनॅशनल स्कूलची विद्यार्थिनी अदिती अलाहित हिने प्रथम क्रमांक पटकाविला.

नाशिक विभागीय पातळीवरील स्पर्धेसाठी अदिती अलाहित हिने प्रवेश मिळविला असून या सन्मानार्थ स्पोर्ट्स हाऊस, जळगाव तर्फे अदिती हिस सुवर्णपदक देण्यात आले. पारितोषिक वितरण महाराष्ट्र बुद्धीबळ संघटनेचे उपाध्यक्ष फारुक शेख यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी स्पर्धेचे समन्वयक प्रशिक्षक मीनल थोरात, मुख्य पंच प्रवीण मकरे, दत्तू सोमवंशी, चंद्रशेखर देशमुख, रवींद्र धर्माधिकारी इत्यादी मान्यवर उपस्थित होते. तसेच गुरुकुल इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य प्रेम शामनानी, मुख्याध्यापिका कल्पना वाणी, क्रीडा शिक्षक दिलीप चौधरी, पर्यवेक्षक अमिना बोहरा तसेच शाळेचे शिक्षक वृंद यांनी अदिती अलाहीत ला पदक देऊन सन्मानित करत पुढील यशस्वी वाटचालीत शुभेच्छा दिल्या. अदिती अलाहित हिचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक केले जात आहे.


Protected Content

Play sound