यावल , प्रतिनिधी | Iयेथील एम. बी. तडवी सर आणि जुबेदा मुजाद तडवी यांची आदिवासी विकास एकात्मिक प्रकल्पस्तरिय जिल्हा समितीवर सदस्यपदी निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री ना. के. सी. पाडवी यांच्या आदेशाने चोपडा येथील डॉ. चंद्रकांत जामसिंग बारेला यांच्या नेतृत्वाखाली जिल्हापातळीवरील प्रकल्पस्तरीय समितीवर यावल येथील सेवानिवृत्त मुख्याध्याक व आदिवासी चळवळीतील जेष्ठ कार्यकर्ते तथा आदिवासी तडवी भिल्ल एकता मंचचे प्रदेश अध्यक्ष एम. बी. तडवी यांची आणि जुबेदा मुजाद तडवी यांची सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. एम. बी. तडवी सर यांच्या निवडीमुळे सातपुडा पर्वताच्या अतिदुर्गम क्षेत्रात पाडया वस्तीवरील वास्तव्यास असलेल्या आदिवासी बांधवांच्या शैक्षणिक व विविध मुलभुत नागरी समस्या मार्गी लागतील असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
एम. बी. तडवी सर व त्यांच्या पत्नी जुबेदा मुजाद तडवी यांच्या निवडीबद्दल राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष अॅड. रवीन्द्र भैय्या पाटील, युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवीन्द्र नाना पाटील, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष प्रा. मुकेश येवले सर , यावल नगर परिषदचे माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक अतुल पाटील, युवकचे तालुका अध्यक्ष अॅड. देवकांत पाटील, काँग्रेस कमेटीचे तालुका अध्यक्ष प्रभाकर आप्पा सोववणे, चोपडा विधानसभा क्षेत्राचे प्रमुख अनिल साठे, यावल पंचायत समितीचे गटनेते शेखर सोपान पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तुषार पाटील ( मुन्ना ), शिवसेनेचे तालुकाप्रमुख रविन्द्र सोनवणे यांच्यासह महाविकास आघाडीच्या पदाधिकारी यांनी त्यांच्या निवडीचे स्वागत केले आहे.