जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत आहे. भविष्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हावासियांनी घ्यावयाची काळजी याबाबत जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांची मुलाखत आकाशवाणीच्या जळगाव केंद्रावरुन रविवार, दि. 31 मे, 2020 रोजी सकाळी ठिक 7:25 वाजता प्रसारित होणार आहे.
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यातील प्रशासन करीत असलेल्या उपाययोजना, स्वयंसेवी संस्थांचा सहभाग, मदत कार्य आणि लॉकडाऊनच्या काळात जिल्हावासियांनी घ्यावयाची काळजी व खबरदारी या व इतर अनेक बाबींची माहिती जिल्हाधिकारी डॉ ढाकणे आपल्या मुलाखतीत देणार आहे. ही मुलाखत जळगाव आकाशवाणीचे ज्येष्ठ उद्घोषक सतीश पप्पु यांनी घेतली आहे. तरी जिल्हावासियांनी ही मुलाखत रविवार, 31 मे, 2020 रोजी सकाळी ठिक 7.25 मिनिटांनी आपल्या जळगाव आकाशवाणीवर ऐकायला विसरु नये. असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांनी केले आहे.