जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । नागरिकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी दरमहा पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार सोमवार, दि. ५ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेला आहे.
सदर लोकशाही दिनी ज्या नागरिकांना अर्ज करावयाचा असेल त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. असे निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.