जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | काव्यरत्नावली चौकात ‘श्रीं’च्या मुर्त्यांचे संकलन करण्यात आले. हे संकलन युवाशक्ती फाऊंडेशन व भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दि. ९ सप्टेंबर रोजी करण्यात आले.
श्रींच्या मुंर्तीचे संकलन केंद्रावर जळगाव शहरातील ४२८४ घरगुती श्रींचे संकलन करण्यात आले. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सपत्नीक येऊन स्वत:च्या घरची श्रींची मुर्ती विसर्जनासाठी अर्पण केली.
सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत या संकलन केंद्र नागरीकांच्या सेवेत सुरू होते. ट्रक व ट्रॅक्टर यांच्या ९ फेऱ्या करून या मुर्तींचे विधीवत मेहरूण तलावावर विसर्जन करण्यात आले. यावेळी ५ ट्रॅक्टर निर्माल्य संकलीत झाले.
उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी युवाशक्ती फाऊंडेशनचे कार्याध्यक्ष पियुष हसवाल, गणपती मंडळाचे अध्यक्ष प्रितम शिंदे, हर्षल तेली, समिर कावडीया, भवानी अग्रवाल, सयाजी जाधव, संस्कृती नेवे, चेतना जैन, विराज कावडीया, अमित जगताप, भटू अग्रवाल, राहूल चव्हाण, सौरभ कुळकर्णी, प्रशांत वाणी, तेजस श्रीश्रीमाळ, जय जैन, मनोज चव्हाण, विपीन कावडीया, सागर सोनवणे, राहूल ठाकून, ऋषिकेश देशमुख, अजय खैरनार, तृषांत तिवारी कन्हैय्या सोनार, यश लोढा, यश श्रीश्रीमाळ आदि. युवाशक्तीच्या स्वयंसेवकांनी परीश्रम घेतले.
दिवसभरात पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे, मनपा आयुक्त विद्या गायकवाड, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी कुमार चिंथा, पोलीस अधिक्षक लिलाधर कानडे, विजय शिंदे, महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी संकलन केंद्राला भेट देत उपक्रमाचे कौतुक केले.
१० दिवस श्रद्धा भावाने पूजन केलेले श्रींची मुर्ती शहरातील ४२८४ कुटुंबांनी विधीवत विसर्जन करण्यासाठी आम्हाला देऊन नागरिकांनी युवाशक्ती फाऊंडेशन व भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन यांच्यावर जो विश्वास दाखविला आम्ही ऋणी आहेत अशी भावना आयोजकांनी व्यक्त केली. या उपक्रमाला जळगाव शहर मनपा व जळगाव जिल्हा पोलीस दल यांचे सहकार्य लाभले.