जळगाव प्रतिनिधी । आज रात्री आलेल्या रिपोर्टमध्ये जिल्ह्यात अजून २६ पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले असून यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधीतांची संख्या ४१४ इतकी झाल्याची माहिती प्रशासनाने जाहीर केली आहे.
आज रात्री जिल्हा माहिती कार्यालयाने कोरोनाबाबतचे स्टेटस एका प्रेस नोटच्या माध्यमातून अपडेट केले आहे. यानुसार-जिल्ह्यातील भुसावळ, चाळीसगाव, चोपडा, वरणगाव, धरणगाव पारोळा येथील स्वॅब घेतलेल्या संशयित कोरोना व्यक्तीपैकी 114 व्यक्तींचे तपासणी अहवाल नुकतेच प्राप्त झाले असून त्यापैकी 88 व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर सव्वीस व्यक्तीचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तीमध्ये भुसवाळ येथील 21, वरणगावचे 3, चाळीसगाव व पारोळा येथील प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या 414 इतकी झाली आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.