जिजामाता माध्यमिक विद्यालयात योग शिबीराचा समारोप

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मुळजी जेठा महाविद्यालयातील सोहम डिपार्टमेंट ऑफ योगा ॲण्ड नॅचरोपॅथी विभागच्या वतीने अंतर्गत एम.ए. योगिक सायन्स पदविका अभ्यासक्रमाच्या अंतर्गत येणाऱ्या निःशुल्क योग शिबिराचा नुकताच समारोप हरीविठ्ठल नगरातील जिजामाता माध्यमिक विद्यालयात करण्यात आला.

मंचावर सोहम डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथी विभागाच्या योगशिक्षक प्रा. अनंत महाजन, मुख्याध्यापक राजेंद्र खोरखेडे यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाप्रसंगी विद्यालयाचे किशोर पाटील, संजय पाटील, यांच्यासह आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. समारोप कार्यक्रमात प्रा. अनंत महाजन यांनी उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांना योगा विषयी मार्गदर्शन केले. योग शिक्षिका सुनिता बडगुजर, पुजा सोनवणे यांनी १३ फेब्रुवारी ते २१ फेब्रुवारी रोजी दरम्यान जिजामाता मध्यमिक विद्यालयात नि:शुल्क योग शिबीरात विद्यार्थ्यांकडून योगाचे प्रात्यक्षिके करून घेतले. या शिबिराला विभागप्रमुख प्रा. डॉ. देवानंद सोनार, प्रा. गीतांजली भंगाळे, प्रा. पंकज खासबागे, प्रा. अनंत महाजन, प्रा. डॉ. सोनल महाजन, प्रा. ज्योती वाघ यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन योगशिक्षिका सुनिता बडगुजर यांनी केले तर प्रास्तविक व आभार योगशिक्षिका पुजा सोनवणे यांनी मानले.

Protected Content