पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तलाठी कॉलनी भागातील थकीत मालमत्ता धारकांकडून तसेच रक्कम रुपये ४ लाख १६ हजार ९७५ रुपये थकबाकी असल्याने जी.ओ. कंपनीचा टॉवर बंद करण्याची धडक कार्यवाही करण्यात आली. पाचोरा येथील नगरपरिषदेच्या विविध कर वसूलीची धडक मोहीम मुख्याेधिकारी शोभा बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली न. पा. अधिकारी, कर्मचारी तिव्रतेने करीत आहेत.
अनेकदा सुचना, नोटीसा देऊन देखील थकबाकी वसूल होत नसल्याने १९ जानेवारी रोजी झालेल्याथ धडक मोहीमेत तलाठी कॉलनी भागातील थकीत मालमत्ता धारकांकडून तसेच रक्कम रुपये ४ लाख १६ हजार ९७५ रुपये थकबाकी असल्याने जी.ओ. कंपनीचा टॉवर बंद करण्याची धडक कार्यवाही करण्यात आली. त्याच प्रमाणे काही थकबाकीदारांनी देखील येणे असलेली थकबाकी न भरल्याने त्यांचे ८ ते १० नळ संकूलन बंद करण्यात आले असून नगरपरिषदेने ज्या कोणा थकबाकीदाराकडे रक्कर येणे असेल त्यांनी त्व रीत भरणे बाबत आवाहन केले असून थकबाकी न भरलेले नळ संकूलन तात्काळ बंद करण्यात येऊन मालमत्ता जप्तीची कार्यवाही करणार येणार आहे.
त्याच प्रमाणे शहरातील जागाभाडे / गाळाभाडे थकबाकी धारकांनी देखील त्यांचेकडेस येणे असलेली बाकी त्वरीत भरावी अन्यथा त्यांचा गाळा सिल करण्याची देखील कार्यवाही करण्यात येऊन दि. १ मार्च २०२३ नंतर दरमहा २ टक्के प्रमाणे अथवा वार्षिक २४ टक्के या प्रमाणे व्याजदर आकारणी करण्यात येणार असल्याचे नगरपालिका प्रशासतर्फे कळविण्यात आले आहे. सदर धडक मोहीमेत मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली पथक प्रमुख दत्तात्रय जाधव यांच्या पथकात राजेंद्र शिंपी, भिकन गायकवाड, विशाल मराठे, शाम अहिरे, विलास कुलकर्णी आदी कर्मचा-यांचा समावेश आहे. पाचोरा शहराच्याा विकासासाठी नागरीकांनी थकीत करांचा भरणा करण्याकबाबत तसेच कटू प्रसंग टाळण्यासचे आवाहन मुख्यााधिकारी तथा प्रशासक शोभा बाविस्कर यांनी केले आहे.