जामुनझिरा येथील भोंगऱ्या बाजाराला सुरूवात

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या जामुनझीरा या आदीवासी गावात होळीचे औचित्य साधुन आदिवासी बांधवांचा भोंगऱ्या बाजाराला आजपासून सुरूवात झाली आहे.

या होळीच्या सणाला पावरी आदीवासी बांधव हे भोंगऱ्या बाजार म्हणतात. या सणासाठी लक्ष वेधणाऱ्या सातपुडा पर्वताच्या पंचक्रोशितील आदीवासी समाजामध्ये मोठ्या उत्साहाने तयारी करण्यात येत असते. महीलांपासून ते लहान मुला मुली मध्ये त्यांचे पारंपारीक आकर्षक पोषाक घालण्याची एक वेगळीच प्रथा आहे . समाजातील तरुणाला आपले प्रेम हे खरे आहे, हे सिद्ध करण्यासाठी अग्निच्या पेटल्या ज्वालांमध्ये उडी घेतली होती, परंतु निष्पाप व प्रांजळपणे केलेल्या प्रेमामुळे ती तरुणी अग्निज्वालांमधुन जिवंत बाहेर आली व तिचि अग्निपरिक्षा झाल्यावर तिचा विवाह बांबुकाम करणाऱ्या भोंगडा नामक तरूणाशी आंतरजातीय विवाह झाल्याचे सांगण्यात येते. तेव्हापासुन या भोंगडा नांवावरूनच अपभ्रंशाने हे या भोंगऱ्या बाजार या उत्सवाने पडल्याचे म्हणतात. तेव्हापासुन होळीने केलेल्या या सत्वपरिक्षेची स्मृती म्हणुन हा भोंगऱ्या सण साजरा करतात. या भोंगऱ्या बाजारासाठी खान्देशातील सातपुडा पर्वतात विखुरलेल्या स्वरूपात राहणारे आदीवासी समाज बांधव एकच येतात.

यावल तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या जामुनझीरा या सुमारे ५oo लोकवस्तीच्या गावात प्रथम भोंगऱ्या बाजाराचे आयोजन करण्यात आले. या भोंगऱ्या बाजारास चांगला प्रतिसाद मिळाला असून आदीवासी तरूण तरुणी हे आपले पारंपारिक पोषाक परिधान करून ढोलच्या तालावर पावरी गाण्यांवर गोल आकार करून आकर्षक नृत्य करतांना दिसून येत आहे. जामुनझिरा तालुका यावल येथे हा भोंगऱ्या बाजार ४ ते ५ दिवस चालणार असून इंद्रदेवाच्या पुजा करून होळी , धुलीवंदन खेळुन या उत्सहाची आदीवासी बांधवांकड्डन सांगता होणार आहे .

Protected Content