जामनेर व्यापारी संकुल घोटाळा चौकशी समितीशी ॲड.विजय पाटील यांची तासभर चर्चा ; कागदपत्रे दिली

 

 

जळगाव : प्रतिनिधी । जामनेर कॉम्प्लेक्स घोटाळ्यातील उपलब्ध जळगावात चौकशी  समितीची भेट घेतली तासभर चर्चा केली कागदपत्रे समितीकडे सोपविली आहेत. लागेल ती  मदत मी तक्रारदार म्हणून देण्यास  केव्हाही करण्यास तयार असल्याचा या समितीला  शब्द दिला.असल्याचे आज ॲड.विजय पाटील यांनी सांगितले

 

या समितीमध्ये आणखी विशेष बांधकाम व महसूल क्षेत्रातील टेक्निकल अधिकाऱ्यांची नेमणूक करावी असा मुद्दा या चर्चेत विजय पाटील यांनी  मांडला .           बांधकामाची परवानगी किती होती ?एकूण बांधकाम किती झालेले आहे ?  एकूण अतिक्रमण किती केले आहे? याबाबत टेक्निकली बांधकाम क्षेत्राचे नॉलेज असलेला अधिकारी असणे अपेक्षित आहे.  जामनेर नगरपालिकेचे किंवा जळगाव महानगरपालिकेचे अधिकारी घेण्यात येऊ नये अशी विनंती आपण समितीला केली आहे. जामनेर नगरपालिकेत गिरीश महाजन यांची सत्ता आहे जळगाव महानगरपालिकेतील विविध अधिकारी हे खटोड यांच्याशी संबंधित आहे  हे अधिकारी समितीची दिशाभूल करू शकतात हेदेखील आपण समितीच्या लक्षात आणून दिले. महसूलचे देखील अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात यावी व जमीन खरेदी करत असताना झालेल्या कागदपत्रांची चौकशी करण्यात यावी अशीदेखील मागणी आपण यावेळी समितीला केली असल्याचे त्यांनी सांगितले

 

या समितीमध्ये आणखी अधिकारी नेमणूक करून दोन आठवड्यात जामनेरला स्पॉट व्हीजीट करणार असल्याचेदेखील समितीने आश्वासन दिले आहे ., असेही ते म्हणाले

 

स्व.नरेंद्र अण्णांनी ज्या तीन समित्यासोबत कामकाज केले आहे त्याचा मी देखील साक्षीदार  आहे असे आवर्जून सांगत विजय पाटील म्हणाले की , सुधाकर जोशी समिती जळगाव  नगरपालिका संदर्भात नेमण्यात आली होती.या कामकाजाविषयी स्व. नरेंद्र अण्णांसोबत मीदेखील साक्षीदार होतो. सावंत आयोग  माजी नगरसेवक स्व. नरेंद्रअण्णा पाटील यांच्या तक्रारीवरून अण्णा हजारे यांनी आवाज उठवला होता व तक्रार केली होती म्हणून सरकारने नेमला होता  याचे कामकाज शेतकी कॉलेज या ठिकाणी झाले होते यावेळीदेखील मी उपस्थित होतो. ) खाजामिया दंगलप्रकरणी जी चौकशी समिती नेमली गेली होती त्याचे कामकाज जळगाव रेस्ट हाऊसला चालत होते.यावेळी देखील स्व.अण्णांसोबत मी  कामकाज पाहिले आहे. यामुळे चौकशी समित्यांचे कामकाज कशा प्रकारे चालते याबाबत कायदेशीर व प्रॅक्टिकल नॉलेज मला असल्याचे ॲड.विजय पाटील म्हणाले.

सहाय्यक आयुक्त व चौकशी समिती अध्यक्ष मनिष सांगळे व समिती सदस्य सचिव यांच्या सोबत चर्चा करतांना व निवेदन देतांना तक्रारदार  ॲड विजय भास्करराव पाटील,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य रवींद्र नाना पाटील,माजी नगरसेवक अशोक लाडवंजारी ,जिल्हा परिषद सदस्यपती रविंद्र देशमुख,जिल्हा सरचिटणीस अशोक पाटील,माजी नगर सेवक सुनील माळी,विद्यार्थी तालुका अध्यक्ष धवल पाटील,गोटु चौधरी आदी मंडळी उपस्थित होती

Protected Content