जामनेर, प्रतिनिधी | शेतकरी सहकारी संघ लिमिटेडकडून कृषी उत्पन्न बाजार समीती आवारात माजी मंत्री तथा आ.गिरीश महाजन यांच्या हस्ते कृषी उत्पन्न बाजार समिती जामनेर येथे मका खरेदी केंद्राला सुरुवात करण्यात आली.
कृषी उत्पन्न बाजार समीती आवारात मका खरेदी केंद्राला सुरुवात करतांना तहसीलदार अरुण शेवाळे, आत्मा समितीचे अध्यक्ष जितेंद्र पाटील, शेतकरी सहकारी संघाचे चेअरमन चंद्रकांत बाविस्कर, व्हा. चेअरमन बाबुराव गवळी, डॉ. सुरेश पाटील, रमेश नाईक,यासह शेतकरी बांधव उपस्थित होते. याप्रसंगी माजी मंत्री गिरीष महाजन यांनी आघाडी सरकारचा निषेध व्यक्त करीत सरकार शेतकऱ्यांची फसवणूक करत असून सरकारच्या व्यापारी धर्जीण्यावृत्तीमुळे शेतकऱ्यांचा माल व्यापारी कवडीमोल भावात घेत आहेत. शेतकऱ्यांची आर्थिक लूट होत असल्याचे सांगत त्यांनी शेतकरी प्रचंड चिंतेत सापडला असुन बाजार समितीत आज फक्त २५० बारदान शिल्लक आहे. तरी शासनाने बारदान उपलब्ध करावे बाजार समितीना शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव द्यावा अशी मागणी ही त्यांनी यावेळी केली.