जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यासह इतर ठिकाणी दुचाकी चोरी करणाऱ्या संशयित आरोपीला चोरीच्या दुचाकीसह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्यांच्याविरोधात पुर्वीच सोयगाव आणि जामनेर पोलीस ठाण्यात मोटारसायकल चोरीप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, सागर लक्ष्मण हिरे वय 20 रा पहुर कसबे कोळीवाडा गल्ली ता जामनेर जि जळगाव हा जामनेर आणि सोयगाव (औरंगाबाद) येथील दुचाकी चोरून संशयास्पद फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा जळगावचे पथक पोहे विकास वाघ, पो.ना. नंदलाल पाटील, पो.कॉ.विजय पाटील, पो.कॉ. सचिन महाजन, पो.कॉ. भगवान पाटील, पो.कॉ.दत्तू बडगुजर यांनी संशयित आरोपी याला आज २० जुलै रोजी त्याच्या राहत्या घरून अटक केली. त्यांच्या ताब्यातील दोन दुचाकी हस्तगत केल्या असून पुढील कारवाईसाठी जामनेर पोलीस ठाण्यात हजर केले आहे.