जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या ३० वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत रविवारी ६ नोव्हेंबर रोजी जामनेर पोलीस ठाण्यात तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जामनेर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, तालुक्यातील एका गावातील एका भागात राहणारी ३० वर्षीय महिला आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. रविवारी ६ नोव्हेंबर रोजी पहाटे ४ वाजता शौचास जात असताना संशयित आरोपी श्रीराम गोविंदा पाटील याने महिलेशी अंगलट करून तिचा विनयभंग केला. या प्रकरणी महिलेच्या पतीने जाब विचारला असता तिच्या पतीला मारहाण करून दुखापत केली. याबाबत महिलेच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी श्रीराम गोविंदा पाटील यांच्या विरोधात जामनेर पोलीस ठाण्यात रविवारी ६ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी भारत काकडे करत आहे.