जामनेर तालुक्यातील ग्रामपंचायतींसाठी शेवटच्या दिवशी उशिरापर्यंत अर्ज दाखलसाठी गर्दी (व्हिडीओ)

जामनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जामनेर तालुक्यातील बारा ग्रामपंचायतींसाठी निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यात अर्ज दाखल करण्याचा आज अंतिम दिवस असल्याने उशिरा पर्यंत अर्ज स्वीकारण्यात येत होते.

 

 

जामनेर तालुक्यातील टाकळी खुर्द, मोहाडी, मालदाभाडी, सोनारी, चिलगाव, राजनी, पळासखेडा बुद्रुक,  खादगाव, हिग्णे बुद्रुक, करमाड, चिंचखेडा या ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. यात आज अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर उमेदवारांनी आपला अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी केली होती.  उद्या शनिवार दि. ३ रोजी डिसेंबर रोजी अर्जांची छाननी होणार आहे.  दि. ७ डिसेंबर रोजी माघार होणार आहे. तर १८  डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. ही निवडणूक प्रक्रिया तहसीलदार अरुण शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार प्रशांत निंबोळकर यांच्यासह सहा निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कामकाज होणार आहे.

 

Protected Content