जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या २५ वर्षीय महिलेला अश्लील शिवीगाळ करून विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत पहूर पोलीस ठाण्यात रविवारी १९ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेले माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील एका गावात २५ वर्षीय महिलाही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. मोलमजुरीचे काम करून ते आपला उदरनिर्वाह करतात. रविवार १९ फेब्रुवारी रोजी महिलाही घरी असताना गावात राहणारा इस्माईल जाफर तडवी हा घरात घुसून महिलेची अंगलट करून तिचा विनयभंग केला. तसेच नभीशानबाई जाफर तडवी हिने महिलेला शिवीगाळ करून मारहाण केली. हा प्रकार घडल्यानंतर विवाहितेने पहुर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी इस्माईल जाफर तडवी आणि नभीशानबाई जाफर तडवी या दोघांविरोधात पाहून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक फौजदार हंसराज मोरे करीत आहे.