Home Uncategorized जामनेरात प्रियांक खरगे यांच्या पुतळ्याचे दहन !

जामनेरात प्रियांक खरगे यांच्या पुतळ्याचे दहन !


जामनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । काँग्रेसचे नेते प्रियंका खरगे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल अपमानकारक शब्द बोलण्याच्या निषेधार्थ भाजपा युवा मोर्चा व भाजपाच्या वतीने नगरपालिका चौकामध्ये प्रियांक खर्गे यांचा प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले व नंतर पुतळ्याचे दहन करण्यात आले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष निलेश चव्हाण, नवल पाटील, रवींद्र झाल्टे, अतिश झाल्टे, बाबुराव हिवराळे, तेजस पाटील, कैलास पालवे, डॉ. संजीव पाटील, संदीप साळवे, किशोर नाईक, विकास पवार, भाईदास चव्हाण, विकास वंजारी, वैभव पाटील, विजय शिरसाठ, सुभाष पवार, सुनील कलाल यांच्यासह भाजपा युवा मोर्चा व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Protected Content

Play sound