जामनेरात छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त भव्य रॅली (व्हिडिओ)

जामनेर, लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शहरातून सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांची उपस्थिती असलेली ढोल ताशाच्या गजरात भव्य भगवा रॅली काढण्यात आली. शहरवासीयांनी यात सहभागी होत उत्सवाचा आंनद घेतला.

नगरपालिका चौकात उभारली छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची प्रतिकृती

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शहरातील नगरपालिका चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ल्यांची प्रतिकृती उभारण्यात आली होती. याप्रसंगी चौकात माजी मंत्री तथा आमदार गिरीश महाजन यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी लोकनियुक्त नगराध्यक्ष साधना महाजन, उपनगराध्यक्ष प्रा.शरद पाटील, नगर पालिका गटनेते डॉ.प्रशांत मुंडे, भाजपा तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीचे सचिव जितेंद्र पाटील, दीपक पाटील, नगरसेवक अतिश हिवराळे, उल्हास पाटील, सुहास पाटील, जयेश पाटील, महेंद्र बाविस्कर, नाना वाणी, रिजवान शेख, राष्ट्रवादीचे आबा पाटील, डॉ.बाजीराव पाटील, काँग्रेसचे शंकर राजपूत, मूलचंद राठोड, संभाजी ब्रिगेडचे चंद्रकांत भोसले आदींची उपस्थिती होती.

नगरपालिकेमध्ये प्रतिमापूजन –

नगरपालिकेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून पूजन करण्यात आले. यावेळी आमदार गिरीश महाजन, नगराध्यक्ष साधना महाजन, उपनगराध्यक्ष व प्रा.शरद पाटील, मुख्याधिकारी चंद्रकांत भोसले, नगरसेवक सतीश झाल्टे, रिजवान शेख, महेंद्र बाविस्कर, नाना वाणी, जितेंद्र पाटील, उल्हास पाटील, यांच्यासह नगरपालिका कर्मचारी व पदाधिकारी व पत्रकार उपस्थित होते.

‘वाकीरोड छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान’तर्फे ढोल पथक व सजीव आरास रॅली

जामनेर शहरातील बाकी रोड वरील छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठानतर्फे शिवजन्मोत्सव सोहळा निमित्त छत्रपती शिवाजी महाराजांचे पूजन करण्यात आले. यावेळी आमदार गिरीश महाजन, श्याम चैतन्य महाराज, चंद्रकांत बाविस्कर, डॉ.प्रशांत भोंडे, सुहास पाटील, रवींद्र महाजन, उमेश पाटील, प्रफुल्ल महाजन आदींची उपस्थिती होती. यावेळी बाकी रोड वरून जामनेर शहरात प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी ढोल ताशाच्या गजरात छत्रपती शिवाजी महाराज यांची सजीव आरासद्वारे रॅली काढण्यात आली

गिरीशभाऊंनी धरला डी.जे.च्या तालावरील पारंपारिक संगीतावर बेधुंद ठेका

याप्रसंगी कोरोनाच्या नियमांचं पालन करुन उत्साहात शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्याचे शहर वासियांना आवाहन केले. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षाच्या कालखंडानंतर मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा करता येत असल्याचा आंनद व्यक्त करत डी.जे.च्या तालावरील पारंपारिक संगीतावर गिरीशभाऊंनी धरला बेधुंद ठेका धरला.

व्हिडीओ लिंक
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/625474145553108

 

Protected Content