चाळीसगाव प्रतिनिधी । तालुक्यातील जामडी येथे कोरोना बाधीत महिलेच्या संपर्कातील १४ जणांना क्वॉरंटाईन करण्यात आले असून त्यांची चाचणी घेण्यात येणार आहे.
याबाबत वृत्त असे की, चाळीसगाव तालुक्यातील जामडी येथील महिला कोरोना बाधीत असल्याच अहवाल रात्री उशीरा आला आहे. ही महिला भडगाव येथील कोरोना बाधीताचा अंतिम संस्काराला उपस्थित राहिली होती. या महिलेसोबत अंत्यंसस्काराला उपस्थित राहिलेले १४ अन्य जण देखील कोरोना बाधीत असल्याचा अहवाल रात्री आला आहे.
दरम्यान, जामडी येथील महिला बाधीत असल्याची माहिती समोर येताच प्रशासनाने संबंधीत महिलेच्या संपर्कात असलेल्या १४ जणांना क्वॉरंटाईन केले आहे. यातील बहुतांश लोक हे संबंधीत महिलच्या कुटुंबातील सदस्य आहेत. या सर्वांचे स्वॅब घेण्यात येणार आहे.