जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात कोरोनाची दुसरी लाट ?

मुंबई : वृत्तसंस्था । जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता आहे असं मत महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी म्हटलं आहे.

यासंदर्भात डॉ. अर्चना पाटील यांनी राज्यातील सगळ्या डॉक्टरांना, सरकारी रुग्णालयांना, जि्ल्हा रुग्णालयांना, आरोग्य अधिकाऱ्यांना पत्र लिहिलं आहे.करोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी तयार राहा असं या पत्रात त्यांनी म्हटलं आहे. कोणत्याही परिस्थितीत चाचण्या थांबवता येणार नाहीत असंही डॉ. अर्चना पाटील यांनी म्हटलं आहे. एका मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

Protected Content