जातीय दंगली पसरवण्यासाठी मॉरिशसमधून फंडींग

लखनऊ वृत्तसंस्था ।  हाथरस प्रकरणाच्या निमित्ताने जातीय दंगली पसरवण्यासाठी मॉरिशसमधून पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेकडे मॉरिशसमधून तब्बल ५० कोटी रूपयांचे फंडींग झाल्याची धक्कादायक माहिती आज ईडीने समोर आणली आहे.

हाथरस घटनेनंतर जातीय दंगली पसरवण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून ४ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांना मेरठ येथून अटक करण्यात आली आहे. यापैकी एक जामियाचा विद्यार्थीही आहे. युपीमध्ये दंगलीचा कट रचणारा पीएफआयचा मास्टरमाइंड आहे, असल्याचा पोलिसांनी केला आरोप आहे. यापूर्वी, यूपी पोलिसांनीही वेबसाइटच्या माध्यमातून दंगलीच्या कट रचल्याचा दावा केला आहे.

हाथरस पीडितेला न्याय मिळावा, यासाठी तयार करण्यात आलेल्या या वेबसाइटवर बर्याच आक्षेपार्ह मजकूर अपलोड करण्यात आला होता. ईडीने हाथरसमध्ये दंगलीचा कट रचण्याच्या पार्श्‍वभूमीवर गुन्हा दाखल केला आहे. ईडीने केलेल्या प्राथमिक तपासणीत असे दिसून आले आहे, की यूपीमध्ये जातीय दंगली परवण्यासाठी १०० कोटींपेक्षा जास्त रुपयांचा निधी देण्यात आला होता. यातील ५० कोटी रूपये हे मॉरिशसमधून आले होते असे ईडीने समोर आणले आहे.

हाथरस प्रकरणाच्या निमित्ताने जातीय दंगलीच्या आगीत यूपीला जाळून टाकण्याचे षडयंत्र रचण्यात आले होते, असा दावा यूपीच्या सुरक्षा यंत्रणांनी केला आहे. हाथरसमधील घटनेविरोधात हिंसक निदर्शनांची तयारी सुरू होती, असा दावा युपीच्या अधिकार्‍यांनी केला आहे. यासाठी जस्टिस फॉर हाथरस व्हिक्टिम या नावाने ही वेबसाईट तयार केली होती. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेने या माध्यमातून मॉरिशसमधून ५० कोटी मिळवले होते असा दावा ईडीने केला आहे. याच दिशेने आता या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे.

Protected Content