जळगाव प्रतिनिधी । जागतिक शाकाहार दिनानिमित्त आज शुक्रवार १ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वाजता शहरातील सागर पार्क येथून जनजागृती सायकल रॅली काढण्यात आली. या रॅलीचा समारोप महात्मा गांधी उद्यानात करण्यात आला.
सविस्तर माहिती अशी की, जागतिक शाकाहार दिनानिमित्त सागर पार्क येथून आज शुक्रवार १ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वाजता जनजागृती सायकल रॅली काढण्यात आली. ही रॅली सागर पार्क, आकाशवाणी चौक, जिल्हाधिकारी कार्यालय, स्वातंत्र्य चौक, कोर्ट चौक, नेहरू पुतळा चौक, टॉवर चौक, घाणेकर चौक, सुभाष चौक, राजकमल टॉकीज, चित्रा चौक, जी.एस. मैदान, नविन बसस्थानक आणि महात्मा गांधी उद्यान दरम्यान काढण्यात आली. कोरोना नियमांचे पालन करून ही सायकल रॅली काढण्यात आली होती. त्यानंतर महात्मा गांधी उद्यानाजवळ सायकल रॅलीचा समारोप करण्यात आला होता. सायकल रॅलीत सहभागी झालेल्या स्पर्धकांना आल्पोहार देण्यात आला. तर महात्मा गांधी उद्यानात मान्यवरांच्या उपस्थितीत सभा घेण्यात आली.
या सभेला कस्तुरचंद बाफना, सुशील बाफना, नयनतारा बाफना, अजय ललवाणी, राजेश जैन, शहर वाहतूक निरीक्षक श्री कानडे, आमदार राजुमामा भोळे, दीपस्तंभचे संचालक याजुवेंद्र महाजन, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, दिलीप गांधी, प्रविण पगरिया यांच्यासह आदिंनी सहभाग नोंदविला होता. यावेळी विविध स्पर्धांमध्ये यश संपादन केलेल्या सायकलीस्ट खेळाडूंचा सत्कार करण्यात आला होता.
भाग १
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/387604112914361
भाग २
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/387947169487335